Ad will apear here
Next
छोट्या छोट्या गोष्टी
पुस्तकांच्या नावाप्रमाणे विजय पाडळकर यांनी सांगितलेल्या या छोट्या छोट्या कथा आहेत. कमी शब्दांत खूप काही सांगण्याचे त्यांचे कसब या कथांमधून दिसते. ‘काळजी’ या कथेतला विरोधाभास स्पर्शून जातो. पैसा, मानमरातब पाहून मित्र भारावून गेलेला असतो; मात्र, त्यापाठीमागचे वास्तव त्याला माहित नसते.

‘दृष्टीकोन एक’मधील इंद्रधनुष्य पाहण्याची दृष्टी किंवा ‘फूल’मधील पारिजातकाच्या फुलांचे तरल, भावूक विश्व, ‘कवी, झाड आणि कविता’मधील वास्तव शेवट, ‘सुख’मधील फोमची गाडी, ‘आस’ या कथेतील संवेदनशील आविष्कार, ‘पुरस्कार’मधील आदर्श शिक्षकाचा खरा चेहरा, ‘आर्ट’मधील क्षणात संपणारी आयुष्यभराची घालमेल अशा कितीतरी गोष्टी पुन्हा पुन्हा वाचाव्याशा वाटत राहतात. काही कथा अचानक धक्का देतात आणि विचारप्रवृत्त करतात. ‘परीक्षा’, ‘मर्जी’, ‘अरे देवा’ या लघुत्तम कथा आहेत.

प्रकाशक : अभिजित प्रकाशन
पाने : १३५
किंमत : १५० रुपये
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/FZKRBN
Similar Posts
स्त्रीसंवेद्य स्त्रीच्या मनाला विविध कंगोरे असतात. ते जाणून घेते. साहित्याच्या स्त्रीमनाचा शोध डॉ. नीलिमा गुंडी यांनी ‘स्त्रीसंवेद्य’मधून घेतला आहे. याचा प्रारंभ एकोणिसाव्या शतकातील महत्त्वाच्या लेखिका ताराबाई शिंदे यांच्यापासून केला आहे.
उजेड आणि सावल्या ‘ललित स्वरूपाच्या लेखनात वाचकाला आपली हरवलेली, विखुरलेली संवेदनशीलता सापडते,’ असे डॉ. सिसिलिया कार्व्हालो यांनी या पुस्तकाच्या प्रस्तावनेत म्हटले आहे. ते खरेच, करण म्हणूनच वैचारिक साहित्याच्या जमान्यात ललित लेखनाचा वाचक टिकून आहे.
मातृभूमीसाठी सावरकरांनी घेतलेली शपथ स्वातंत्र्यवीर सावरकरांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी ‘मारिता मारिता मरेतो झुंजेन’ अशी शपथ घेतली होती. ती त्यांनी खरी करून दाखवली. ‘अभिनव भारत’ ही संघटना सुरू करताना त्यांनी या कार्यात सहभागी होण्यासाठी आपल्यापेक्षा वयाने मोठ्या व्यक्तींनाही कसे मार्गदर्शन केले होते आणि त्यांचे विचार किती स्पष्ट होते, याची झलक दाखविणारा, वि
कवितेच्या शोधात कविता करणे हा अनेकांचा छंद असतो. कविता अनेक प्रकारच्या असतात. त्यातून प्रेम, माया, भक्ती, राग-लोभ, चीड, संताप अशा मनातील सर्व भावना व्यक्त होतात. संतांच्या रचना याही कवितेचाच एक भाग असतात. अशा अनेकविध काव्याचे व कवींचे रसग्रहण अरुणा ढेरे यांनी ‘कवितेच्या शोधात’ यातून केले आहे.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language